भूगोलाची तयारी एमपीएससी (पेपर १)
मित्रांनो, भूगोल हा उपघटक राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर-१, तसेच मुख्य परीक्षा पेपर-१ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपघटक आहे. या घटकावर राज्यसेवा पूर्वपरीक्षेला साधारणत: १०० प्रश्नांपकी १५ ते १८ प्रश्न बेतलेले असतात, तर मुख्य परीक्षेला १५० प्रश्नांपकी साधारणत: ७० ते ७५ प्रश्न विचारले जातात. पर्यावरणशास्त्र हा उपघटक भूगोलाशीच संबंधित आहे. या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार केल्यास राज्यसेवा पूर्वपरीक्षेला साधारणत: १०० प्रश्नांपकी ४० ते ४५ प्रश्न विचारले जातात.
या घटकाची तयारी करताना सर्वप्रथम इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या राज्य सरकारच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी हे वाचन करणे आवश्यक आहे. यानंतर पूर्वपरीक्षेचा व मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम समजून घ्यावा. जर आपण २०१५ साठी प्रयत्न करणार असाल तर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्वपरीक्षेची तयारी करावी. मुख्य परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमातील घटक अभ्यासले तर पूर्वपरीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज भासत नाही. भूगोल या घटकाचा अभ्यासक्रम साधारणत: खालील प्रकारे विभाजित करता येऊ शकतो-
१. प्राकृतिक भूगोल - बदललेल्या परीक्षापद्धतीनुसार हा उपघटक पूर्वपरीक्षेसाठी व मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. यात पृथ्वीच्या अंतरंगाची रचना, खडक, खडकांचे प्रकार, ज्वालामुखी, भूकंप, ज्वालामुखी व भूकंपाचे जागतिक वितरण, भुरुपिकी चक्रांची संकल्पना, नदी-हिमनदी-वारे यामुळे तयार झालेली भूरूपे, समुद्रतटावर तयार झालेली भूरूपे, भारताचा प्राकृतिक भूगोल व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याचा अभ्यास करावा.
२. हवामानशास्त्र- प्रत्येक परीक्षेला या उपघटकावर प्रश्न विचारले जातात. यात वातावरणीय घटक आणि त्याची संरचना उदा. तपांबर, स्थितांबर, आयनांबर यांचा अभ्यास, हवेचे तापमान, हवेचा दाब, तापमानाचे वितरण, तापमानाचे आडव्या दिशेतील व क्षितिज समांतर वितरण, भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय वारे, आवर्त, प्रत्यावर्त या उपघटकाबरोबरच महाराष्ट्रीय हवामानाची वैशिष्टय़े, भारतीय हवामानाची वैशिष्टय़े यांचाही अभ्यास करावा. हा घटक समजण्यासाठी सोपा आणि रंजक आहे. मात्र या उपघटकावरील प्रत्येक संकल्पना पाठ करण्यापेक्षा समजून घ्याव्यात.
३. मृदा- मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि घटक, मृदेमधील खनिजे व सेंद्रिय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषणमूल्य, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण उदा. काळी मृदा, जांभी मृदा इ. जमिनीची धूप आणि धुपेचे प्रकार यांचा अभ्यास करावा.
४. लोकसंख्या भूगोल- महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण, भारतातील लोकसंख्येचे वितरण, स्थलांतर, स्थलांतराची कारणे, पूर्वपरीक्षेला साधारणत: २ ते ३ प्रश्न या उपघटकावर विचारले जातात. मात्र मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य परीक्षेला साधारणत: ८ ते १० प्रश्न यावर विचारले जातात. म्हणून अभ्यास करताना हा उपघटक व्यवस्थित अभ्यासावा. यात डाटा जास्त असल्याने या उपघटकावर सूक्ष्म नोट्स तयार करून त्या पुन:पुन्हा वाचाव्यात म्हणजे पाठांतराची गरज पडत नाही. हा घटक परीक्षेच्या ऐनवेळी तयार होत नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये, शेवटची दहा राज्ये, घनतेच्या दृष्टीने पहिली दहा राज्ये, शेवटची दहा राज्ये, लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण, त्याचे वितरण, यानुसार पहिले पाच व शेवटचे पाच राज्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे वितरण, या दृष्टीने पहिले पाच राज्य व शेवटचे पाच राज्य अशा प्रकारे अभ्यास करावा. भारताचे लोकसंख्येचे वितरण अभ्यासल्यानंतर महाराष्ट्राचे लोकसंख्येचे अभ्यासावे व शेवटी २००१ ते २०११ जनगणना यांचा तुलनात्मक अभ्यास करावा.
५. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल - वरील घटक अभ्यासल्यानंतर महाराष्ट्राचा व भारताचा घटक स्वतंत्रपणे अभ्यासावा. हा घटक संघलोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून राज्यसेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा प्राकृतिक सामाजिक व आíथक भूगोल तसेच भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल असा शब्दप्रयोग वापरलेला आहे.
६. भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलात भारताचे व महाराष्ट्राचे स्थान विस्तार, नदीप्रणाली हवामान, मृदा, नसíगक वनस्पती यांचा अभ्यास करावा. अभ्यासासाठी नकाशाचा वापर करावा, बरेच प्रश्न नकाशाशी संबंधित विचारले जातात.
७. भारताच्या व महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलात महाराष्ट्राची व भारताची लोकसंख्या व लोकसंख्येचे वितरण, २००१ ते २०११ जनगणना त्याचा तुलनात्मक अभ्यास.
८. महाराष्ट्राचा व भारताचा आíथक भूगोल - परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात महाराष्ट्रातील व भारतातील खनिज साधनसंपत्ती, उद्योगधंदे, कृषी, जलसिंचन, पशुधन व मासेमारी इ. उपघटकांचा अभ्यास करावा. महाराष्ट्रातील व भारतातील खनिज संपत्तीमध्ये मँगनीज, लोहखनिजे, बॉक्साइट, चुनखडी यांचे वितरण तसेच ऊर्जा संपत्तीमध्ये दगडी कोळसा, जलविद्युत, औष्णिक ऊर्जा, अणुऊर्जा यांचा अभ्यास करावा. याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या व भारताच्या आíथक भूगोलात रस्ते, जलमार्ग, विमानमार्ग यांचा अभ्यास करावा. रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग, जलमार्ग, राज्यमहामार्ग यांचा अभ्यास करावा.
९. जगाचा भूगोल - जगाचा भूगोल हा घटक फक्त पूर्वपरीक्षेलाच विचारला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा घटक थोडा अवघड जातो. यासाठी कोणते अभ्यास साहित्य वापरावे याबाबत देखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरेतर या घटकावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, तसेच हा घटक फक्त पूर्वपरीक्षेला असल्याने सर्वप्रथम खंडानुरूप देश समजून घ्यावेत नंतर त्यातील डोंगररांगा, नदीप्रणाली, जागतिक हवामान, खनिजसंपत्ती, कारखाने यांचा अभ्यास करावा. जगातील समुद्र, त्या समुद्राजवळचे देश यांचा अभ्यास करावा.
आपण वर पाहिलेल्या उपघटकांच्या व्यतिरिक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खालील काही अतिरिक्त घटकांचादेखील अभ्यास करावा लागतो.
१. पर्यावरण भूगोल खरेतर पर्यावरणशास्त्र हा स्वतंत्र उपघटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपणास अभ्यासावा लागतो. म्हणून येथेच त्याचा सर्वागाने अभ्यास केल्यास पूर्वपरीक्षेसाठी त्याचा जास्त फायदा होतो. मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रमात खालील िबदूचा अभ्यास आवश्यक आहे. यात परिस्थितीकी आणि परिसंस्था, पर्यावरण, अवनती आणि संवर्धन, जैवविविधता, जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणविषयक कायदे, क्योटो प्रोटोकॉल, नागरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन यातील जैवविविधता, जैवविविधतेचा अभ्यास. या उपघटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. पर्यावरणविषयक सर्व कायदे व्यवस्थित अभ्यासावेत.
२. कृषीपरिस्थितीकी - या उपघटकात पिकांचे वितरण, त्याचे उत्पादन, पीकवाढीसाठी आवश्यक असणारे हवामानाचे घटक, जलदर्जा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, कोरडवाहू शेती आणि तिची समस्या, ठिबक सिंचन, तुषार सिंचन या घटकांचा व्यवस्थित अभ्यास करावा.
३. दूरसंवेदन - परीक्षार्थीना सर्वात अवघड वाटणारा हा घटक आहे. यावर दरवर्षी साधारणत: २ ते ५ प्रश्न विचारले जातात. हा घटक पूर्वपरीक्षा तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेदेखील अत्यंत उपयुक्त आहे. यात दूरसंवेदनाची संकल्पना, भारतीय दूरसंवेदन उपग्रह, दूरसंवेदन याचे नसíगक साधनसंपत्तीमध्ये उपयोजन, भौगोलिक माहितीप्रणाली, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली यांचा अभ्यास करावा.
==================================================================
www.spardhaclass.com
MPSC/UPSC/SSC/BANKINNG /PSI / STI /Asst /पोलीस भरती या परीक्षेत यश मिळविण्या करिता जुने व संभ्याव्य ऑन लाईन सराव पेपर/ नियमित चालू घडामोडी ./ शासकीय नोकरीची माहिती मोबाईल अप्स / मासिक चालू घडामोडी मासिक ई -बुक करिता स्पर्धा क्लास. कॉम वेब साईट ला भेट द्या आपल्या सर्व मित्र परिवारांना या संधीचा सदस्य होण्या करिता ह्या लिंक ला क्लिक करा http://www.spardhaclass.com/

ConversionConversion EmoticonEmoticon